Paid-By-Marathi Kattaa

महाराष्ट्र देशातील सर्वात श्रीमंत राज्य कसे बनले पहा!

महाराष्ट्राच्या GDP मागील रहस्य!

          मित्रांनो आपल्या देशात अनेक राज्य आहेत, सर्व राज्यांची आपापली स्वतंत्र ओळख आहे. काही राज्य हे आपल्या वेशभूषा तर काही राज्य अन्नपदार्थ, भाषा, शिक्षण इ. साठी ओळखले जाते. तर कोणते राज्य हे आपल्या सर्वात जास्त GDP साठी ओळखले जाते. अर्थातच मित्रांनो तुम्ही ओळखलच असेल आम्ही बोलत आहोत ते राज्य आहे महाराष्ट्र, जे ओळखले जाते ते आपल्या जीडीपीसाठी. तर एकट्या महाराष्ट्राची जीडीपी ही आपल्या शेजारील असलेल्या पाकिस्तान पेक्षाही जास्त आहे. तर मित्रांनो आज आपण हेच पाहणार आहोत की असे काय आहे महाराष्ट्र की देशातील सर्वात जास्त जीडीपी आहे. (How Maharashtra became the richest state in the country in marathi?)

         तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जीडीपी म्हणजे काय आणि ती काशाप्रकरे ठरविली जाते ? तर मित्रांनो एखाद्या देशाची किंवा राज्याची जीडीपी ही त्या राज्यातील किंवा देशातील अर्थव्यवस्था (Economy) आणि मालमत्ता किंमत (Property Value) याचा विचार करून जीडीपी तयार केली जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे योगदान खूप मोठे आहे. 

How Maharashtra became the richest state in the country

         आता आपण महाराष्ट्र हे देशातील न.1 जीडीपी राज्य कसे बनले ते पाहू? तर महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12 करोंड आहे. तसेच महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 307,713 km² इतके आहे आणि महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाणही चांगले आहे. महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण 82.9% इतके आहे. यामुळे महाराष्ट्रातील कंपनीमध्ये काम करणारे लोक चांगले शिक्षित आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात दूसरा तर क्षेत्रफळाच्या बाबतील महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. देशाच्या एकूण जीडीपी एकटा महाराष्ट्र 15% एवढे योगदान देतो. जे की दुसऱ्या कोणत्याही राज्याच्या तुलनेत जास्त आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही पाकिस्तान आणि बलुचिस्तान यासारख्या देशांहून जास्त आहे.

          आता आपण हे पाहू की महाराष्ट्र हे राज्य एवढे श्रीमंत कसे बनले? महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिति पाहता महाराष्ट्र 5 प्रदेशात विभागाला गेला आहे, यामध्ये कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र हे प्रमुख प्रदेश आहेत. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील कृषि विभाभागावर जास्त जोर देण्यात आला. यामध्ये ऊस, कापूस, तेल उत्पादक पिके यावर जास्त जोर देण्यात आला. महाराष्ट्रात ऊसाची लागवड जास्त असल्याने तेथे सहकारी साखर कारखाने यांची स्थापना करण्यात आली. आज महाराष्ट्रात एकूण 173 सहकारी साखर कारखाने आहेत. देशातील सर्वात जास्त साखर उत्पादन करणारे राज्य देखील महाराष्ट्रच आहे. महाराष्ट्राने सन 2021-22 या काळात 137.28 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. जे कोणत्याही राज्याच्या तुलनेत खूपच जास्त आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेती तर देशात सर्वत्रच केली जाते तर मग महाराष्ट्रच का एवढे श्रीमंत झाले? महाराष्ट्रात ऊसाबरोबरच हळद, बाजरी, तंबाखू, तेल उत्पादक पिके इ. पिके घेतली जातात. त्यामुळे कृषितून महाराष्ट्राला एक चांगला हिस्सा प्राप्त होतो. 

          फक्त शेतीच नाही तर महाराष्ट्रात दळणवळणाच्या सोई-सुविधा उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात तीन आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ(मुंबई), डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर), पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुणे) हे आहेत. याचबरोबर महाराष्ट्रात 8 घरगुती विमानतळे आहेत. याशिवाय महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभल्याने व्यापारात चांगला फायदा होतो. महाराष्ट्रात 48 किरकोळ तर 2 प्रमुख बंदरे आहेत. यामध्ये मुंबई आणि जवाहरलाल नेहरू हे दोन प्रमुख बंदरे आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची संधी निर्माण होते. देशातील जवळपास 25% उद्योग महाराष्ट्रात आहेत. तरीही महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय हा शेतीच आहे. महाराष्ट्रातील जवळपास 24% जनता ही शेतीशी जोडली गेली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रदेश महाराष्ट्राच्या जीडीपी त योगदान देतो. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश कशाप्रकारे आपले योगदान देतो ते आता पाहू,

  • कोकण : कोकण हा प्रदेश मासेमारी आणि हापूस आंब्यासाठी ओळखला जातो. त्याचबरोबर कोकणातील मुंबई हे शहर महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये 6% योगदान देते. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मानली जाते. एकट्या मुंबई मध्ये भारतातील मुख्य कंपन्यांचे मुख्यालय आहेत त्यामध्ये SBI, RBI, Mutual Fund, Godrej, Tata, Reliance याशिवाय देशाची सर्वात जुना स्टॉक एक्स्चेंज (BSE) ही मुंबईतच आहे. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी महाराष्ट्रातील मुंबईत रेल्वे, रस्ते, बंदरे यांचा विकास करणे सुरू केले होते. जशी मुंबई विकसित झाली तशी गुजराती, बिहार, उत्तर प्रदेश यांसारख्या देशातून मुंबईत स्थलांतर वाढले. नंतर इंग्रजांनी मुंबईत कापड उद्योग सुरू केला. नंतर मुंबईतून कपडे युरोपला जाऊ लागली यानंतर मुंबईत संपूर्ण बॉलीवूड आहे याचेही योगदान महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये आहे. याशिवाय मोठमोठ्या टेलिविजन कंपन्याही मुंबईतच आहेत. यानंतर महाराष्ट्रात सगळ्या प्रकारच्या खनिजे खाणी आहेत. 
  • पश्चिम महाराष्ट्र : पश्चिम महाराष्ट्र हा प्रदेश महाराष्ट्रातील सर्वात विकसित प्रदेश मानला जातो. या प्रदेशातील पुणे हे शहर खूप विकसित आहे. देशातील सर्वात मोठ्या IT कंपन्या ह्या पुणे शहरात आहेत यामध्ये TCS, INFOSYS, WIPRO, COGNIZANT यांसारख्या मोठ्या कंपन्या यात सामील आहेत. यानंतर या प्रदेशात खूप पर्यंटनस्थळे आहेत. यामध्ये महाबळेश्वर, माथेरान, छत्रपतो शिवाजी महाराजांचे किल्ले इ.  यानंतर पुण्याला विद्येचे माहेरघर असे संबोधले जाते. त्यामुळे पुण्यात Pune University, Ferguson College, Symbiosis College यांसारख्या सर्वात मोठ्या Universities आहेत. पश्चिम महाराष्ट्र हे 24% योगदान महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये देते. 
  • उत्तर महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक हे शहर दारू उत्पादनासाठी ओळखले जाते. याचेही महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये खूप योगदान आहे. Hindustan Unilever, Coca-Cola, Mahindra $ Mahindra यांसारख्या मोठमोठ्या कंपन्या उत्तर महाराष्ट्रात आहेत. उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये 11.6% योगदान देतो. 
  • मराठवाडा : मराठवाडा या विभागामध्ये सर्वात जास्त गरीबी आणि विकासाचा अभाव जाणवतो, हा दुष्काळी भाग म्हणून गणला जातो. तरीपण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हे शहर आपल्या कापड उद्योगामुळे आणि डाळी, कॉटन सारख्या उद्योगामुळे ओळखले जोतो. मराठवाडा 9.3% एवढे योगदान महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये देतो. 
  • विदर्भ : विदर्भातील धर्मल पॉवर साठी ओळखला जातो. याशिवाय या भागात जंगलांचे प्रमाण जास्त आहे. बासमती तांदूळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याशिवाय विदर्भात वेगवेगळ्या तांदळाची उत्पादन घेतले जाते. विदर्भ महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये 14.8 %  योगदान देतो. 

महाराष्ट्रातील प्रत्येक प्रदेश हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत योगदान देतो.त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. (How Maharashtra became the richest state in the country?)

संबंधित लेख