नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कट्टाच्या वेबसाइटवर तुमचं स्वागत आहे. तुम्हालाही अॅसिडिटी झालीये का? तर मित्रांनो घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. आम्ही घेऊन आलो आहोत अॅसिडिटीवर रामबाण उपाय तो केल्यानंतर केवळ 5 सेकंदात तुम्हाला फरक जाणवेल, आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की असा कोणता उपाय आहे तर चला मित्रांनो आज आपण पाहू की असा कोणता उपाय आहे ते!
आता आपण पाहू अॅसिडिटी कशामुळे होती ते -
- सतत मसालेदार पदार्थ खाणे.
- सतत मांसाहार सेवन करणे.
- सतत मद्यपान करणे.
- अकाली, अवेळी, अति प्रमाणात जेवण करणे.
- अॅसिडिटीची लक्षणे -
- छातीत जळजळ करणे.
- उलट्या होणे.
- डोके दुखी.
- छातीवर दबाव येणे.
- सतत ढेकरा येणे.
- तोंड आंबट पडणे.
अॅसिडिटी होत असल्यास कोणता आहार घ्यावा ? -
गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यासोबतच वारंवार अॅसिडिटी होत असलेल्यानी मुगाच्या डाळीचा वापर जास्त करावा. दुधी भेंडी, पडवळ, कोबी, केळफुल, दोडकी, वांगी, शिराळे, सुरण, फरसबी अशा फळभाज्यांचे अधिकाधिक सेवन करावे. फळांचा वापर भरपूर करावा जसे की डाळिंब, आवळा, नारळ, अंजीर, आंबा इ. काळा मनुका आणि आवळा ही फार उपयुक्त फळे आहेत. तूप हे अतिशय गुणकारी आहे, ते रोज घ्यावे. जेवल्यानंतर लगेच आंबट गुळणी येत असल्यास दूध कमी प्रमाणात घ्यावे तसे पोटात जळजळ होत असल्यास दुधू आणि खडीसाखर मिसळून प्यावे. सतत अॅसिडिटी होत असेल तर दही खाऊ नये.
अॅसिडिटी होत असल्यास कोणता आहार घेऊ नये ? -
वारंवार अॅसिडिटी होत असल्यास उडदाच्या डाळीपासून बनविलेले पदार्थ जसे की इडली, डोसा इ. पदार्थ खाणे टाळावे. तसेच तूर डाळ, मसूर डाळ,कडधान्यांच्या उसळी जास्त प्रमाणात खाऊ नयेत. कारली,गवार, मेथी, शेवगा, अंबाडी, फ्लॉवर जास्त प्रमाणात खाऊ नये. जास्त प्रमाणात अॅसिडिटी होत असेल तर मासे, अंडी, मटन खाणे टाळावे. चिंच, टोमॅटो, संत्री, अननस, ताडगोळे, लिंबू, मोसंबी ही फळे कमी प्रमाणात खावी. मैदा युक्त पदार्थ टाळावे. तेलकट आणि तिखट पदार्थ सहसा टाळावे.
अॅसिडिटी वरील रामबाण घरगुती उपाय -
- सकाळी एक चमचा जिरे खावीत आणि खाल्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे. हा उपाय सात दिवस करून पहावे. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.पाणी पिताना सोमट पानी प्यावे.
- जर पहिल्या उपायाने फरक पडला नाही तर दूसरा उपाय हा सकाळी एक ग्लास पाणी सोमट करून त्यात एक चमचा शुद्ध गाईचे तूप टाकावे आणि प्यावे. हे केल्यानंतर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
आम्ही आशा करतो की वरील उपाय केल्यानंतर तुमची अॅसिडिटी नाहीशी होईल आणि तुम्हाला आराम मिळेल.
धन्यवाद !
Tags :
#How to get relief from acidity in marathi
#how to get relief from acidity instantly in marathi
#how to get relief from acidity instantly in marathi
#what to eat in acidity in marathi